ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यातील आंबी येथे एका बंद खोलीत मृतदेह आढळून आला. शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून ते मावळ तालुक्यातील आंबी येथे वास्तव्यास होते. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ते या ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. या बातमीने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचं अस आकस्मीक निधन झालं आहे.