ताज्या बातम्या
आजरा गडहिंग्लज तालुक्याच्या रेंजर पदी प्रथमतः महिला वनअधिकारी ची नियुक्ती

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
गडहिंग्लज वन परिक्षेत्राच्या परिक्षेत्र वनअधिकारी आजरा या पदावर सौ स्मिता होगाडे (डाके ) यांची पदोन्नती ने नियुक्ती झाली असून त्यांनी दिनांक 17 मे 2021 रोजी आजरा वनपरिक्षेत्र चा कार्यभार घेतला आहे. त्यांचे शिक्षण बी.एस.सी झालेले आहे. त्यांची नोकरी ची सुरवात दि. 01/07/2008 रोजी वनपाल पदावर झाली असून त्यांनी वनपाल पदाचे 1 वर्ष कालावधी चे प्रशिक्षण दि. 01/07/2008 ते 30/06/2009 चिखलदरा येथे पूर्ण केले आहे. त्यांनी 2009 ते 2018 मध्ये सामाजिक वनिकरण विभाग कोल्हापूर व 2018 ते 2021 कोल्हापूर वनविभाग मध्ये वनपाल पदावर सेवा बजावली आहे. त्यांना पन्हाळा प्रेस रिपोर्टर कोतोली चा आदर्श वनअधिकारी हा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी आज बी एल कुंभार वनपाल गडहिंग्लज यांचेकडून आजरा वनपरीक्षेत्र चा कार्यभार घेतला आहे