ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी पोस्ट कार्यालयात आय.पी.पी.बी सेवा सुरू करावी

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
नेसरी ता.गडहिंग्लज येथील सब पोस्ट कार्यालयात आय पी पी बी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही सेवा बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. या योजनेअंतर्गत लोकांना खाते उघडणेसाठी अर्जुनवाडी किंवा शिपुर या ठिकाणी जावे लागत आहे. परिणामी लोकांचा नाहक वेळ जात आहे तर बटकणगले येथेही सदर सेवा बंद आहे.तरी पोस्ट विभागाने याची दखल घेऊन सदर सेवा नेसरी व बटकनगले येथे तात्काळ सुरू करावी अशी मागणी होते आहे.