ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : वरपे कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना ठाकरे गट त्यांच्या पाठीशी राहणार ; शहरप्रमुख रविकिरण इंगवले

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून वारंवार मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं सांगत वरपे कुटुंबीयांनी पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी केली. क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांनी राजेंद्र वरपे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचं सांगत सिद्धी वरपे यांनी पत्रकार बैठकीत वरपे कुटुंबियांची बाजू मांडली.

शनिवार पेठ इथल्या शिवगंगा संकुल मध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फ्लॅट समोर राजेंद्र वरपे राहण्यास आहेत. मात्र, आमचा फ्लॅट बळवकण्यासाठी राजेश क्षीरसागर आम्हाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप सिद्धी वरपे यां नी केलाय .राजेश क्षीरसागर आपले वडील राजेंद्र वरपे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देतायत असा आरोप करत सिद्धी यांनी क्षीरसागर यांच्याकडं असलेली बंदूक पोलिसांनी जप्त करावी अशी मागणीही केली.

क्षीरसागर यांच्याकडून होणारी मारहाण आणि जिवे मारण्याच्या धमकीची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देऊनही पोलीस आमची फिर्याद दाखल करून घेण्यास तयार नाहीत, असंही सिध्दी वरपे यांनी सांगितलं. त्यामुळं आम्ही हतबल झालो आहोत. आम्हाला न्याय मिळत नसल्यानं आम्ही, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सर्व कुटुंबिय उपोषणाला बसणार आहोत. न्याय मिळत नसल्यानं प्रसंगी आत्महत्या करण्याचा विचार आम्ही करत असल्याचं सिद्धी यांनी सांगितलं.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी म्हंटले की राजेश क्षीरसागर हे जिल्ह्यातील कलंकित नेतृत्व असल्याची टीका केली. सर्वसामान्यांना त्रास देत त्यांची घरे बळकावणारे क्षीरसागर यांची समाजातील पात्रता संपलीय. वरपे कुटुंबीयांना ज्या दिवशी मारहाणीची घटना घडली. त्यावेळी राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर हे दोघे दारूच्या नशेत होते. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

क्षीरसागर यांनी सर्वसामान्यांना त्रास देण्याऐवजी त्यांनी आमच्याशी लढावं असं आव्हानही रविकिरण इंगवले यांनी दिलं आहे .वरपे कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना ठाकरे गट त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं शहरप्रमुख इंगवले यांनी स्पष्ट केलं . या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक धनंजय सावंत,राजेंद्र वरपे, शुभांगी वरपे, शौर्य वरपे उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks