ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा , हवामान खात्याकडून अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचे आहेत. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या मोसमामध्ये पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.