ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुंबई मार्केटसाठी ‘गोकुळ’चे २३३ कोटी बजेट

कोल्हापूर प्रतिनिधी :
मुंबई ची दुधाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी नव्या संचालक मंडळाने कंबर कसली आहे. वाशी येथील प्लॅन्टसाठी 29 कोटी आणि सिडकोकडून मिळणार्या पनवेल येथील जागा विकसित करून प्लॅन्ट सुरू करण्यासाठी 204 कोटी असे एकूण 233 कोटी रुपयांचे बिग बजेट नियोजन संचालक मंडळाने आखले आहे. इतका मोठा खर्च एकदम न करता टप्प्याटप्प्याने नियोजन करावे, असा सूर विरोधी आघाडीने लावला आहे