सारथी संस्थेची ची स्वायत्तता फसवी, मराठ्यांची शुद्ध फसवणूक : सुनील देवरे; अजित दादांनी तारादुत प्रकल्प सुरु करण्याचा आदेश देऊनही प्रस्ताव मान्यतेसाठी मंञालयात

मुंबई प्रतिनिधी :

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी सारथी संस्थेची स्थापना झाली.15 ऑक्टोंबर च्या परिपत्रकानुसार सारथी संस्थेला मेमोरेंडम ऑफ असोसिएशन नुसार कार्य करण्यासाठी स्वायत्तता देण्यात आली. सारथी संस्थेच्या उपक्रमांमध्ये मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये सारथी संस्थेच्या माध्यमातून तारादूत, किसान दूत, महिला सक्षमीकरण, एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग,कौशल्य विकास यासारख्या कल्याणकारी उपक्रमाचा समावेश आहे.या उद्दिष्टांवर कार्य करण्यासाठी 15 ऑक्टोबर नुसार स्वायत्तता देण्यात आली आहे. तर मग तारादूत प्रकल्पलासह अन्य योजनेचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंञालयात कसा पाठवला गेला? दिनांक 19 जून 2021 रोजी झालेल्या मा.अजितदादा पवार, मा.युवराज छत्रपती संभाजीराजे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक,तारादूत प्रतिनिधी तसेच सारथी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अजितदादांनी सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहील तसेच तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते.असे असतांना देखील दिनांक 14 जुलै 2021 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये तारादूत प्रकल्पासह ईतर प्रकल्पांना मान्यता घेणे अपेक्षित होते,परंतु तारादूत प्रकल्पासह अन्य योजनेचा प्रस्ताव नियोजन विभाग, वित्त विभाग आणि हाय पावर कमिटीच्या मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवण्यात आलेला आहे. प्रत्येक उपक्रमाची मान्यता मंञालयातुन घेण्याची आवश्यकता सारथी संस्थेला पडत असेल तर सारथी संस्थेला दिलेली स्वायत्तता ही फसवी आहे का? असं म्हणण्याची वेळ तर आलीच पण हे सर्व करत असतांना मराठ्यांची शुद्ध फसवणूक करुन महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाचा घात करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे बार्टी संस्थेप्रमाणे सारथी संस्थेला स्वायत्तता देऊन सारथी संस्थेतील स्थगित असलेला तारादूत प्रकल्प तसेच अन्य कौशल्य विकास प्रशिक्षण तात्काळ सुरू करावेत अन्यथा सारथी संस्थेसमोर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा क्रांती मोर्चा विविध मराठा संघटना,तारादूत, अति तिव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले. मराठा क्रांती मोर्चाचे खान्देश समन्वयक व तारादूत सुनील देवरे यांनी सांगितले.