एजंटगिरी व लाचारी मोडून काढण्यासाठी “समरजितसिंह आपल्या दारी “उपक्रम : राजे समरजितसिंह घाटगे ; उच्चांकी १०५३ लाभार्थ्यांची नोंदणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शासनाच्या योजनांच्या लाभासाठी कागलमध्ये नागरिकांना वर्षांनुवर्षे मंत्र्यांच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत. त्यांच्या राजकीय सभा समारंभांना उपस्थित राहण्यासाठी लाभार्थ्यांवर सक्ती करून त्यांना वेठीस धरले जाते. ही लाचारी व एजंटगिरी मोडून काढण्यासाठी राज्यात सर्वप्रथम समरजितसिंह आपल्या दारी हा अभिनव उपक्रम आम्ही राबविला आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजे फौंडेशन व राजमाता जिजाऊ समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला संकल्प करुया, ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया’ उपक्रमांतर्गत ‘समरजितसिंह आपल्या दारी’ अभियानावेळी ते बोलत होते.
यावेळी मुरगुडसह परिसरातील बारा गावातील १०५३ उच्चांकी लाभार्थ्यांनी नोंदणी केली. विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप केले. तसेच मुरगुड विद्यालयास समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल या प्रशालेचा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल राजवर्धन पुजारी याचा सत्कार केला.
श्री घाटगे पुढे म्हणाले,स्व. विक्रमसिंह राजेंच्या संस्कारानुसार आम्ही लाभार्थ्यांना पारदर्शीपणे एक रुपयाचाही भ्रष्टाचार न करता शासकीय योजनांचे लाभ देऊन त्यांना प्रत्यक्ष विधायक कार्यातून गुरुदक्षिणा देत आहोत.याचा 2024 ला आम्हाला फायदा होईल.
गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील म्हणाले, शासनाच्या कल्याणकारी योजना ‘समरजीतसिंह आपल्या दारी’ उपक्रमातून वंचित लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत.हा स्तुत्य विधायक उपक्रम आहे. त्यामुळे या योजनांमधील दलाली बंद पाडण्याचे काम होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या गोरगरिबांचा आशीर्वाद आमदारकीच्या रूपाने राजेंना मिळणार आहे.
व्यासपीठावर शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस,दत्तामामा खराडे,विलास गुरव,बजरंग सोनुले,सचिन भाऊसाहेब कांबळे,आरुण गुरव,अमर चौगले, विजय राजगिरे, सुहास मोरे, एकनाथ बरकाळे विजय राजीगरे ,यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वागत सुशांत मांगोरे यांनी केले. आभार प्रवीण चौगुले यांनी मानले.
मोठे राजकीय पद नसताना राजेंचा कामाचा धडाका….
समरजितसिंह घाटगे यांच्याकडे कोणतेही सत्तेचे मोठे पद नाही. मात्र कागल विधानसभा मतदारसंघात विविध शासकीय योजना, आरोग्य शिबिर, अशा विविध माध्यमातून सर्वसमावेशक कामांचा राजेंनी धडाका लावला आहे. राजेंच्या कामाचे सर्व सामन्यातून कौतुकच होत आहे.असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी यावेळी केले.