आरोग्यताज्या बातम्या
महागोंड ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप; डॉ. लोखंडे दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम.

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
महागोंड व महागोंडवाडी येथील ग्रामस्थांना डॉ. जितेंद्र लोखंडे व ग्रा. पं. सदस्य निलांबरी लोखंडे यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक औषधे (च्यवनप्राश , इम्युनिटी बूस्टर) वाटप करण्यात आले. गेले आठवडाभर महागोंड गाव कोरोनाचे हॉटस्पॉट झाले होते तर किमान ४ ते ५ जण दगावले, यामुळे ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधात्मक औषधे स्वतः तयार करून वाटप करीत आहेत. हे कुटुंब गेली काही वर्षे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होते आहे. दररोज सकाळी ०८.०० वाजता औषधी काढ्याचे वाटप करण्यात येत आहे. सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. जितेंद्र लोखंडे यांनी केले आहे.