ताज्या बातम्याभारत

सीमावासीयानी अनुभवला शून्य सावली दिवस; कुरलीतील सिद्धेश्वर विद्यालयाचा उपक्रम

कोगनोळी :

मनुष्याची सोबत कोणी करो ना करो त्याची सावली मात्र सदैव त्याच्या सोबत असते. हीच सावली काल दिनांक पाच मे रोजी गायब झाली. अशा या खगोलशास्त्रीय चमत्काराचा अनुभव संपूर्ण सीमावासीयांनी घेतला.

बुधवारी दुपारी 12:29 वाजता काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ कुरली – निपाणी परिसरातील लोकांना घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ आज या परिसरातील स्थिती अनुकूल होती.सूर्य डोक्यावर येतो किंवा आला असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात दोन दिवस वगळता सूर्य कधीच आपल्या डोक्यावर येत नाही, थोडा ना थोडा तो तिरपा असतोच. तो प्रत्यक्ष डोक्यावर येण्याचे यावर्षीचे दोन दिवस म्हणजे 5 मे आणि 7 ऑगस्ट. सिद्धेश्वर विद्यालय कुरली येथील विज्ञान शिक्षक एस एस चौगुले यांनी शून्य सावली दिवसाचे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. आकाशातून सूर्याचे भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असते ज्याला उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना साडेतेवीस अंशाचा कोन करीत असते. ज्या दिवशी, ज्या वेळी हा कोन होतो त्या वेळी शून्य सावली दिवस येतो. मजेशीर बाब म्हणजे हा सर्वत्र सारखा नसतो तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात असतो. विद्यालयातील सर सी व्ही रामन विज्ञान प्रसार नेटवर्क क्लब यांच्या वतीने दरवर्षी शून्य सावली दिवसाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांनी याचा घरीच अनुभव घेतला.

कुरली परिसरातच सावली का गायब झाली ?
कुरलीचे अक्षांश 16.74 अंश उत्तर आहे. सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट उत्तरायण किंवा दक्षिणायनामध्ये 16.74 अंश असतो तेव्हा कुरलीत सूर्य डोक्यावर येतो. म्हणजेच दुपारी 12:39 वाजता सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट 16.74 अंश असल्याने आज शून्य सावली दिवस अनुभवता आला. विद्यालय परिसरात कोरोना नियमाचे पालन करून शून्य सावली पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी श्री बी एस पाटील, टी एम यादव, एस एस साळवी, के एम शेवाळे, टी के जगदेव,वाय टी पाटील,नवनाथ पाटील,संदिप चौगुले, अथर्व गरगोटे,आदर्श डोंगरे, दिग्विजय यादव, रोहन मस्कर, प्रणित डोंगरे उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks