शास्त्रज्ञ निर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : रणजीतसिंह पाटील

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले आहेत त्यामधील ज्यांची उपकरणे जिल्हा पातळीवर निवड करण्यात येतील त्या विद्यार्थ्यांना जर योग्य मार्गदर्शन झाले तर खरंच ते उदयोन्मुख भारताचे वैज्ञानिक म्हणून पुढे येतील. मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेज हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित शिक्षण संस्था असून येथून अनेक नर रत्ने घडली आहेत. तोच ठेवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंत इथे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी जपून ठेवला असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीत सिंह पाटील यांनी केले.
पंचायत समिती शिक्षण विभाग कागल व मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड यांच्यावतीने आयोजित 51 व्या कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते यावेळी बिद्रीचे माजी संचालक दत्तामामा खराडे मुख्याधिकारी संदीप घारगे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर गटशिक्षणाधिकारी डॉक्टर गणपती कमळकर प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी नाका नंबर एक पासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी रेखाटलेली सडा रांगोळी लक्षवेधी ठरली या ग्रंथ दिंडीमध्ये लेझीम लाठी काठी हालगी यांच्या वाद्याच्या गजरातच प्राचीन संस्कृती जतन करून ठेवण्याच्या सजीवकृती प्रत्यक्ष विद्यार्थिनींनी साकारल्या होत्या यामध्ये तांदूळ नीट करणे ताक तयार करणे चुलीवरील भाकरी भाजने झिम्मा फुगडी लेझीम जात्यावरील ओवी आधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बाजारपेठेला आज या ग्रंथदडीमुळे वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते.
ग्रंथ दिंडी नंतर आयोजित कार्यक्रमात रणजीत सिंह पाटील संदीप घारगे दीपक भांडवलकर यांची भाषणे झाली यावेळी ए एम पाटील ए.पी.फराकटे महादेव गुरव रवींद्र भोई प्रकाश मगदूम वसंत जाधव दत्तामामा जाधव अनंत फर्नांडिस, रामभाऊ खराडे, रमेश कांबळे सुनील पाटील आवेलीन देसाई शिक्षण विस्तार अधिकारी शामराव देसाई आर एस गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत प्राचार्य एस आर पाटील प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉक्टर गणपती कमळकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील तर आभार उपप्राचार्य एस .पी. पाटील यांनी मांडले.