ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यावर कारवाई चुकीची, खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या, मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

(या बैठकीत राजू जाधव यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यात आला व महेंद्र पंडित, जिल्हा अधीक्षक पोलीस कोल्हापूर यांची भेट घेऊन निवदेन देण्यात आले, अशी माहिती मनसे जनाधिकार सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे यांनी दिली.)

कोल्हापूर :

मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यावर पूर्वग्रहदूषित हेतूने कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि लोकशाहीचे संरक्षण करावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. या बैठकीत राजू जाधव यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यात आला व महेंद्र पंडित, जिल्हा अधीक्षक पोलीस कोल्हापूर यांची भेट घेऊन निवदेन देण्यात आले, या निवेदनात

एका कुटुंबाचे चप्पल स्टँड महापालिकेने मंगळवारी दिनांक १०/१०/२०२३ रोजी काढले. त्या कुटुंबाने केलेल्या विरोधानंतर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा नोंदवला. त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या काम करणाऱ्या गोरगरीब सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आमच्या मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव हे त्या ठिकाणी बेकायदेशीर प्रमाणे अतिक्रमण काढणाऱ्या अधिकारांवरती जाब विचारला म्हणून यांच्या वरती देखील सरकारी कामात अडथळा केल्याचा खोटा गुन्हा व बेकायदेशीर गुन्हा नोंदवला.

सामाजिक दृष्ट्या गोरगरिबांच्या, सर्वसामान्य लोकांच्या अडचणीमध्ये धावून जाणाऱ्या मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांचेवर खोटे व बेकायदेशीर गुन्हे मागे घ्यावेत व मनपाच्या कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यावरती गुन्हे नोंद व्हावेत, अशी आमच्या मनसेचे मागणी आहे.

या बैठकीत मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यावरील बेकायदेशीर कारवाईसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर मनसे शिष्टमंडळाने माहितीसाठी प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा अधिकृत मेल आयडीवर निवेदन पाठवले. यावेळी प्रशांत माळी, राज मकानदार, बबन सावरे, राहुल कुंभार अमित कोरे, प्रवीण मनुगडे, सौरभ कांबळे, रवी हातकर, अतुल भालकर, संजय पाटील, वैभव सतळे, नागेश चापे, ऋषभ आमते, रिक्सन डिसोजा, पांडुरंग कगरे, प्रवीण माने, प्रमोद पाटील, नयन गायकवाड, अमर वडर, अशोक पाटील, किरण जाधव, संपतराव पाटील, अण्णा टिळवे, किरण पोतदार, गणेश बुचडे, नरेंद्र चिकोडीकर, प्रकाश देसाई, दयानंद भोईटे, ओमकार कोळी, तुषार चिकुर्डेकर, संदीप पताळे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks