पन्हाळा : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार व धमकीप्रकरणी एकावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

कळे प्रतिनिधी : अनिल सुतार
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार, मारहाण व बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी श्रीकांत बाजीराव चोपदार रा.वाळोली ता.पन्हाळा याच्या विरोधात कळे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरपण ता.पन्हाळा येथील मागासवर्गीय महिलेला दि 9/2/2022 ते दि 15/8/2023 पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कोल्हापूर, गगनबावडा,कळे परिसरात ठिकठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन तसेच मोबाईल रेकॉर्डींग करत व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन श्रीकांत बाजीराव चोपदार रा.वाळोली ता.पन्हाळा याच्याविरोधात विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जे.बी सुर्यवंशी करत आहेत.