स्वराज फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रणव रामाणे यांचा वाढदिवस ‘अनाथांसोबत’ ; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच जिलेबी वाटप

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथील स्वराज फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ,सामाजिक कार्यकर्ते प्रणव प्रकाश रामाणे यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणे साजरा करीत शिवराज विद्यालय येथील बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप व जिलेबी वाटप करून साजरा केला.तसेच चिमगाव येथील शिवशंकर प्राथमिक आश्रम शाळेतील अनाथ मुलांना जिलेबी वाटप केले व त्यांच्या सोबतच आपला वाढदिवस साजरा केला. गेली दोन वर्षे ते आपला वाढदिवस अशाच पद्धतीने अनाथ मुलांच्यासोबत साजरा करतात.
यावेळी चिमगाव आश्रम शाळेचे प्राचार्य कृष्णात दाभोळे ,बाजीराव जाधव, तसेच शिवराज बोर्डिंगचे अधीक्षक संदीप सावर्डेकर यांचेसह प्रकाश रामाणे,लखन वरपे,भिकाजी रामाणे,राहुल घोडके ,सागर कुंभार,रोहित मोरबाळे,सागर वाघरे, हिंदुराव राऊत, दत्तात्रय पौंडकर, बबलू सोळोखे, तुषार डेळेकर ,योगेश सारंग ,समाधान रामाणे,विश्वजित रामाणे ,पप्पू कोळी,आकाश डेळेकर ,यांचेसह
विद्यार्थी तसेच स्वराज फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते.