ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राज्यात तब्बल 10 हजार पदांची होणार शिक्षक भरती

शिक्षक भरती परीक्षांची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. गेली अनेक वर्षांपासून ज्या भरतीची वाट पाहत होतात त्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महाराष्ट्रात आता तब्बल दहा हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
यासंदर्भात शिक्षण विभागाकडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना तयारी करण्याची सूचना देण्यात आली आहे.
शिक्षक भरती परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. या भरती परीक्षेच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत.