आरोग्यजीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
श्री. क्षेत्र आदमापूर : बाळूमामांचे मंदिर शनिवारी, रविवारी बंद

मुदाळ तिट्टा :
महाराष्ट्र, गोवा, आंध्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामांचे मंदिर अमावास्या दिवशी म्हणजे शनिवार, दि. ७ ऑगस्ट व रविवार, दि. ८ ऑगस्ट रोजी व इतर दिवशीही शासकीय आदेश येईपर्यंत बंद राहील. हा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. ही बैठक आदमापूर येथील बाळूमामा देवालयात घेण्यात आली. भाविकांनी मंदिराकडे दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी केले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले होते. सरपंच विजयराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.