सौ प्रिया गोखले यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महिला व बालविकास विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सौ. प्रिया मोहन गोखले यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल ग्राम पंचायत कुरुकली ता. कागल जिल्हा कोल्हापूर यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार या सन्मानाने गौरव करण्यात आला.
सौ. प्रिया गोखले या गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक संस्था मधे सोबत महिला सबलीकरण सक्षमीकरण ,मासिक पाळी व्यवस्थापन आदी विषयांवर गडहिंग्लज, कागल , कोल्हापूर च्या ग्रामीण भागात काम करत आहेत. सद्या शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दुर्बल विद्यार्द्याना शालोपयोगी साहित्य वितरण असे विविध उपक्रम राबवले जातात शिवाय वेदगंगा मल्टिपर्पज निधी च्या माध्यमातून ग्रामीण महिला आर्थिक सक्षम व्हाव्यात बचत गट अधिक बळकटी आनण्यासाठी आर्थिक कार्यशाळा राबविल्या जातात तसेच स्वप्नपूर्ती फाउंडेशन च्या माध्यमातून एकल, विधवा महिलांसाठी विविध शासकीय योजना पोहचविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत ग्रामपंचायत कुरुकली यांनी घेतली
आज ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिल्ड, प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सरपंच सौ मीनाक्षी कुंभार उपसरपंच श्री गिरीश पाटील, ग्रामसेवक श्री प्रवीण पाटील, केडीसिसी बँकेचे चे बँक निरीक्षक श्री अरुण पाटील, विवेकानंद कांबळे, सौ, मेघा बेलवळेकर ,सौ सुरेखा पाटील,वेदगंगा मल्टिपर्पज निधी चे संस्थापक चेअरमन डॉ मोहन गोखले ग्रामपंचायतीचे सदस्य अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.