बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी यापुढेही सदैव कटिबद्ध : नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; कुरुकली येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट वाटप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र शासनाच्या कामगार योजनेतून आमदार हसन मुश्रीफ साहेब यांनी विविध काम करणाऱ्या कामगारांसाठी त्यांची सुरक्षितता राहावी. या उद्देशाने बांधकाम कामगारांना सुरक्षा किट सर्वत्र मोफत वाटप सुरू केले आहे. आज कुरुकली तालुका कागल या गावांमध्ये गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना नविद मुश्रीफ म्हणाले की, आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेबांनी वेगवेगळ्या कामाची या बांधकाम कामगार योजनेमध्ये नावे वाढवून अधिकाधिक लोकांना न्याय मिळेल, असे काम केले आहे. या संपूर्ण सुरक्षा किटचा वापर आपण नेहमी करावा व आपली स्वतःची काळजी घ्यावी. सर्वसामान्य कामगारांच्या सोबत हसन मुश्रीफ साहेब हे नेहमी हिमालयासारखे उभे आहेत.
कुरुकली गावातील आज अखेर नोंदी झालेल्या 483 बांधकाम कामगारांना जवळपास 16 लाख रुपयाच्या विविध लाभाच्या योजना आज अखेर प्राप्त झाल्या असून यापुढेही कामगारांच्या सर्व प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा बिद्री कारखाना संचालिका सौ अर्चना विकास पाटील होत्या.
कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विकास पाटील बोलताना म्हणाले की आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून आज अखेर शासनाच्या विविध योजना गरजून पर्यंत पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे करत असून या पुढच्याही काळात मा.आमदार हसन मुश्रीफ, मा. नविद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनातून सतत कार्यरत राहू, असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी दत्ता पाटील केनवडेकर, बी .आर. पाटील, व्ही .डी .पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी कुरुकली गावचे सरपंच डी.एल.कुंभार, उपसरपंच गिरीश सयाजीराव पाटील, ग्रा.प.सदस्य कृष्णात पाटील, सुनील बेलवळेकर, सतीश बाचनकर, आप्पासाहेब बेलवळेकर, महेश पाटील, सागर दाभोळे, गुलाब तिराळे, प्रकाश पाटील, अर्जुन पाटील, एकनाथ सुतार, पांडुरंग डवरी, बाळासो पाटील यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. तर आभार सतीश तिराळे यांनी मानले.