मुंबईतील अभिरूप युवा संसदेत गौरव पाटील करणार कोल्हापूर जिल्हयाचे नेतृत्व

नेहरू युवा केंद्र व युनिसेफ (क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय,भारत सरकार) आयोजित ,राज्यस्तरीय अभिरूप युवा संसदेत 36 जिल्ह्यातून 72 युवा संसद प्रतिनिधी येणार आहेत. यापैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील असलेल्या सावर्डे पाटणकर गावातील गौरव दगडू पाटील हा तरुण युवा संसदेत कोल्हापूर जिह्याचे नेतृत्व करणार आहे.
विशेष म्हणजे नुकत्याच भारत सरकार द्वारे दिल्ली येथे झालेल्या “मेरी माती मेरा देश” या अमृत कलश यात्रेकरिता सुद्धा गौरव ची निवड जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली होती. ही राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2023 रोजी राजधानी मुंबई येथील मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस, सांताक्रुज येथे संपन्न होणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या संसदेत विधानभवन, राजभवन, आणि मंत्रालयाच्या भेटीसुद्धा या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत, गौरव च्या निवडीच कौतुक केले जात आहे, याच निवडीचे श्रेय त्याने आईवडील आणि नेहरू युवा केंद्र कोल्हापूरच्या जिल्हा युवा अधिकारी मिस. पूजा सैनी यांना दिले आहे.