नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध : राजे समरजितसिंह घाटगे ; शिंदेवाडीत वॉटर एटीएम सेंटरचे लोकार्पण

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
“सत्ता असो वा नसो , नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत,असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
शिंदेवाडीपैकी शाहूनगर(ता. कागल) येथे मुंबई स्थित एंजल लिंक फाउंडेशन आणि राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या वॉटर एटीएम सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच रेखाताई माळी होत्या.
घाटगे पुढे म्हणाले,या वॉटर एटीएम सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध,आरओ प्रक्रिया केलेले पिण्याचे पाणी वाजवी किंमतीत उपलब्ध होणार आहे.यामुळे नागरिकांची पिण्याच्या शुद्ध पाण्याची गैरसोय दूर होणार आहे. आरोग्यदृष्ट्याही हे एक सकारात्मक पाऊल आहे.
कार्यक्रमास शाहू कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस,संचालक रामभाऊ खराडे, राजे बँकेचे संचालक अमर चौगुले,संजय चौगुले,माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी,ग्रामपंचायत सदस्य अविनाश गोसावी,सरिता पवार,रामेश्वरी खराडे,छाया शिंदे,आक्काताई वंदुरे,रामचंद्र कणसे,मनोहर आवटे,प्रवीण चौगले,पी .एन.देसाई,दगडू माळी आदी उपस्थित होते.
राजे बँकेचे संचालक दत्तात्रय खराडे यांनी स्वागत केले.उपसरपंच अजित मोरबाळे यांनी आभार मानले.