ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड मधील मयूर आंगज यांना ‘राष्ट्रीय आदर्श इंजिनिअरिंग व डेव्हलपर्स’ गौरव पुरस्कार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथील सुप्रसिद्ध इंजिनिअर तसेच समाजसेवक मयूर संभाजी आंगज यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय आदर्श इंजिनिअरिंग व डेव्हलपर्स गौरव पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण बेळगाव येथे झाले.यावेळी पुरस्कार स्वीकारताना वडील प्रा.संभाजी आंगज ,समीर हळदकर,बाळासाहेब सूर्यवंशी उपस्थित होते.याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.