केंद्र सरकार ने विशेष लक्ष घालून महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्याव -प्रा.शहाजी कांबळे

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
संघर्ष योध्दा मनोज जिरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हनून तिव्र आंदोलन सुरू केले आहे.या आरक्षनाच्या लढ्यास महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांकडून उस्पुर्त पाठींबा मिळत आसलेने राज्य व केंद्र सरकारने तातडीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे मत शहाजी कांबळे यांनी मराठा समाजाच्या आरक्षनाच्या आंदोलनास पाठींबा देते वेळी व्यक्त केले.
या आंदोलनास सर्व आंबेडकरवादी समाज पक्ष संघटना जन आंदोलन कोल्हापुर यांचे वतिने पुढील मागण्या करण्यात आल्या.
१)केंद्र आणी राज्य सरकारने विशेष विधिमंडळ अधिवेशन घ्यावे.
२)महाराष्ट्र हि शिव,शाहू,फुले,आंबेडकरी विचारांची भूमी आहे.राज्यामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या मागण्या व भावनांचा आदर करून शासनाने कायदा-सुव्यवस्था हाताबाहेर जाण्यापुर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आशा मागण्या यावेळी आंबेडकरी समाज,पक्ष संघटना जन आंदोलन च्या वतिने दसरा चौक येथे सुरू असलेल्या मराठा बांधवाच्या आंदोलनास निवेदन देवून जाहिर पाठींबा देण्यात आला.
यावेळी दगडू भास्कर,प्रा.शहाजी कांबळे,बी,के.साहेब,बाळासाहेब भोसले,नंदकुमार गोंधळी,विद्यादर कांबळे,रुपाताई वायदंडे,सोमनाथ घोडेराव,सतिश माळगे, लताताई नागावकर, बाजिराव नाईक ,रमेश पायगावकर,शिवाजीराव आवळे,दिपक भोसले,संजय जिरगे,एड.दत्ताजीराव कवाळे,जितेंद्र कांबळे,शिरीष थोरात,अनिल मिसाळ,प्रविन आजरेकर,सिध्दांत देशमुख,प्रशांत आवघडे,खंडेराव कुरणे,प्रदीप ढाले,विजय गोंदणे,सौरभ कोटावळे,अलंकार माने,संग्राम यादव,शेखर कुरणे,चंद्रकांत माने यांच्यासह सर्व पक्षा चे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.