ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम ; “नशा मुक्त भारत अभियान.”

ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाने नशा मुक्तीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. “नशा मुक्त भारत अभियान “असे या उपक्रमाचे नाव असून भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाशी तो सलग्न आहे.
कोल्हापूर विभागाच्या अभियानाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठात झाले व तेथून ते आठवडाभर विद्यालयाच्या विविध केंद्रांनी जिल्हाभर राबविले.
मुरगूड येथील केंद्रामार्फत विविध शाळां मधून ईयत्ता ५वी ते १० वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती वर सुदंर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तंबाखू गुटखा , विडी सिगारेट,मद्यपान यासारख्या नशील्या व्यसनापासून दूर राहावे .
सकाळी उठून ईश्वर प्रार्थनेने दैनंदिन व्यवहार सुरू करावेत.योग साथना व ध्यान धारणा नित्य असली पाहिजेच.महवाचे म्हणजे मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जन म्हणून तात्पुरता असावा.केवळ करमणूक म्हणून नको.त्यामुळे दृष्टी वर व मनावर सुध्दा घातक परिणाम होतो.
मुरगूडच्या ब्रम्हा कुमारी केंद्रामार्फत पुढील शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. ,शिवराज विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय ,न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल स्कूल,स्वामी विवेकानंद कोचींग क्लास, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय,आय टी आय,(सर्व मुरगूड),चौंडेश्वरी हायस्कूल हळदी, वाघापूर हायस्कूल,न्यू इंग्लिश स्कूल,भडगाव,
यामध्ये सहभागी मार्गदर्शक व साधक याप्रमाणे. अरूणाबहेनजी कोल्हापूर,दीपा बहेंनजी कागल,शिल्पा बहेंनजी गुहागर , लता बहेंनजी ,लक्ष्मी बहेंनजी मुरगूड ,पद्मा बहेंनजी सरवडे,अनिता बहेंनजी बाचणी,पद्मा बहेंनजी, लाटवडे,नामदेव भाई, ड्रायव्हर,तुकाराम भांबरे,भिकाजी भंदिगरे,संजय मगदूम,रामचंद्र पाटील, अनील अंगज,सागर नाधवडे, श्रीमंधर महाजन,तानाजी कोरे,संभाजी पाटील.अभियानाचे सर्वत्र उत्सावात स्वागत झाले व केंद्राचे आभार व्यक्त करण्यात आले.