ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : तावरेवाडी येथील ऋतुजा कागनकर नेट परीक्षेत उत्तीर्ण

चंदगड प्रतिनिधी :
तावरेवाडी ता.चंदगड येथील सौ. ऋतुजा शरद कागणकर यांनी joint csir-uGc मार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या NET परीक्षेत रसायन शास्त्र या विषयात देशात ४९ वा क्रमांक पटकावला असून चंदगड तालुक्यातून तिचे कौतुक होत आहे .तर सन २०२० मध्ये झालेल्या GATE परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून तिने रसायन शास्त्र विषयात M.Sc चे शिक्षण घेतले असून हलकर्णी महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे .तिच्या या यशात पती शरद कागणकर, सासरे ए. टी. कागणकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक),भाऊ यांचेसह सर्व परीवाराचे व शिक्षकांचे योगदान लाभले आहे.