युवा पिढीने अध्यात्माकडे वळावे : बी.के. सारिका

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
भारत एकेकाळी सर्वार्थाने संपन्न देश होता .नशा मुक्त असणाऱ्या आपल्या देशातील युवा पिढी सध्या कोणत्या ना कोणत्यातरीज नशेच्या आहारी गेल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे अनेकांचे कौटुंबिक स्वास्थ बिघडल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे अशा स्थितीत युवा पिढीने अध्यात्माची कास धरल्यास तो तणावमुक्त आदर्श नागरिक बनेल असे विचार बी.के. सारिका (दापोली) यांनी बटकणंगले येथे बोलताना व्यक्त केले.
महात्मा फुले हायस्कूल बटकणगले येथे ब्रह्मकुमारी च्या वतीने नशा मुक्त भारत अभियान यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.माजी प्राचार्य एम डी पाटील अध्यक्ष स्थानी होते. माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मा. एम डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.पर्यवेक्षक के आर माने यांनी स्वागत केले.मुख्याध्यापक विजय गुरबे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी बी के चंदा (गांधीनगर) सरपंच धोंडीबा कुंभार, शिवाजीराव हिडदुगी, आप्पा कुंभार, मधुकर नांदवडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सौ सुनीता नाईक यांनी शेवटी आभार मानले.