ताज्या बातम्या

वटपौर्णिमेचे औचित्य साधून चंदगड साहित्य रत्नं परिवारामार्फत वृक्षारोपण.

चंदगड प्रतिनिधी : सोहेल मकानदार

 

साहित्य रत्नं हा वाँट्स अँपच्या माध्यमातून कार्यरत असणारा चंदगड तालुक्यातील साहित्यिकांचा समुह आहे.या समुहाच्या माध्यमातून साहित्य सेवेसोबतचं काही सामाजिक उपक्रम राबवले जातात.म्हणूनचं आज वटपौर्णिमेचे औचित्य साधून या साहित्यिक समुहामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत,हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा…..वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो.पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात.

ह्या दिवसाला एक धार्मिक परंपरा आहे.म्हणून आजच्या दिवशी निसर्गाची सेवा करता यावी.हाच एक उद्देश ह्या वृक्षारोपण सोहळ्यामागे होता. कोरोना स्थितीचा अंदाज घेत प्रत्येक साहित्यिकाने व नैसर्गिक हिताचा विचार करणाऱ्या चंदगड तालुक्यातील प्रत्येक निसर्ग प्रेमींने आपआपल्या घरी वृक्षारोपण करून हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पाडला. चंदगड हा नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध समजला जाणारा तालुका आहे.ह्या तालुक्याचा भोवताल घनदाट झाडांनी वेढला गेलेला आहे.हा उपक्रम पार पाडण्यासाठी संजय साबळे,के.जे.पाटील,प्रमोद चांदेकर,कवी बी.एन.पाटील,राहुल नौकुडकर,विजया उरणकर,कार्तिक पाटील,राजेंद्र शिवणगेकर,अर्जुन मुतगेकर,रजनी कांबळे,जयवंत जाधव,रवी पाटील,प्रशांत गवसेकर,हणमंत पाटील,सुभाष बेळगावकर,राजकुमार पाटील,लखन पाटील,गौरव पाटील,आनंद पाटील व साहित्य रत्नं परिवारातील सदस्यांनी विशेष सहकार्य लाभले.सद्यस्थितीचा अंदाज घेता असे समाजहिताचे उपक्रम गरजेचे आहेत.म्हणून हा उपक्रम कौतुकास्पद समजला जात आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks