सबा चमनशेख चे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

कोल्हापूर :
जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या ज्युनिअर कॉलेज ची विद्यार्थिनी कु.सबा चमनशेख हिने भेटकार्ड बनविणे या राज्यस्तरीय स्पर्धैत उज्ज्वल यश संपादन केले.
या राज्यस्तरीय स्पर्धा सेंटर फाॅर इज्युकेशनल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च पुणे State brilliant art excellence Award आयोजित केल्या होत्या. मेन राजाराम काॅलेज मध्ये शिकणारी सबा हिने State level gretting Card contest 2021 या राज्यस्तरीय स्पर्धेत A grade संपादन करून तिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.भेकटार्डातून तिने सामाजिक संदेश देऊन अगदी घरी उपलब्ध असणार्या साहित्यातून आकर्षक असे भेटकार्ड बनविले होते.
कोरोना कालावधीत सुद्धा विज्ञान शाखेत शिकणारी सबा आॅनलाईन अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या उपक्रमात ,स्पर्धैत हिरहिरीने भाग घेत आहे.
चित्रकला ,पेंटींग, निबंधलेखन , वक्तृत्व, चर्चासत्र, परिसंवाद यामधील ही तिची सृजनशीलता वाखाणण्यासारखी आहे.
या राज्यस्तरीय यश प्राप्त केलेल्या सबाला प्राचार्य सागर नाईक, उपप्राचार्य प्रा विजय डोणे डॉ गजानन खाडे, वर्गशिक्षिका प्रा वनिता खडके,प्रा दिपा लोहार,स्पर्धा विभाग प्रमुख प्रा सुषमा पाटील, प्रा बाबासाहेब माळवे,प्रा.बाबुराव यादव,प्रा हर्षवर्धन काटकर,प्रा विकास पाटील,प्रा भाऊसाहेब धराडे,प्रा सपना माने,प्रा राहूल देशमुख,प्रा अयोध्या धुमाळ ,प्रा प्रणाली जांभळे,प्रिया पुजारी, सचिन चव्हाण राजेंद्र मोरे, निलेश साळुंखे, प्रफुल्ल कदम तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले