ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नंद्याळ – कापशी रोडवरील अपघाताचे कारण बनलेली झाडे झूडपे श्रमदानातून काढली ; नंद्याळ येथील युवकांचा उपक्रम

कागल तालुक्यातील नंद्याळ – कापशी रोड वर अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता गावातील युवक वर्गानी समाज माध्यमाचा चांगला वापर करत रविवारी सुट्टीचा दिवस श्रमदान करून रस्ता सुलभ करण्याचा प्रयत्न केला. गावातील ग्रुपवर भद्रीनाथ येजरे या युवकांने रोड वरील अपघाताचे वाढते प्रमाण या विषयाकडे लक्ष वेधले असता सर्वांना हा मुद्दा महत्वचा वाटला आणि त्यावर चर्चा झाली आणि ग्रामपंचायतीने त्यात पुढाकार घ्यावा असे सूचवले.

या विषयाची दखल उपसरपंच प्रदिप करडे यांनी घेतली व रविवारी सकाळी ९.०० वाजता सर्वांनी स्टॅण्डवर जमावे असे आवाहन केले. त्याला सर्वांनी प्रतिसाद देत ही अडचण दूर करायची असे ठरले ठरल्याप्रमाणे सकाळी ९.०० वाजता श्रमदान चालू केले तासंतासाला युवकांची संख्या वाढत गेली. त्यात pwd चे अधिकारी लोंढेसो आणि सुधाकर कांबळे हे सुद्धा सहभागी झाले.

व लागेल ती यंत्रणा देण्यास तयार आहोत असे सांगून सोबत राहिले. असे करत सर्व युवकांनी हातात कोयता , कुऱ्हाड घेऊन सर्व अडथळ्याच्या झूडपावर तुटून पडलीत क्षणात होत्याची नव्हती करत दिवसभरात तब्बल 3 किलोमीटर चा रस्ता खुला केला. आणि आम्ही आलो तर काय करू शकतो हे दाखवून दिले.

महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा हसन मुश्रीफ साहेब यांनी तसेच संजयबाबा घाटगे यांनी सुद्धा या अभियानास सदिच्छा भेट देत कौतुक केले. त्याचबरोबर सर्व श्रमदान करणाऱ्या शिबिराथी ना चहा नाष्टाची सोय शेतकरी संघटना कापशी विभाग प्रमुख मा पंडीत आण्णा पाटील तसेच शंकर ढेंगे व दिलीप परीट आणि कॉन्ट्रॅक्टर विजय पाटील यांनी केली.

कार्यक्रमच्या समारोपवेळी या सर्वांच्या प्रति उपसरपंच प्रदिप करडे यांनी आभार व्यक्त सर्व युवक वर्ग कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता बोलून कार्यक्रमाचा समारोप झाला.

या प्रसंगी उपस्थित भद्रीनाथ येजरे,सुरेश कांबळे, संजय शिंदे, आनंदा येजरे, आनंदा फगरे, राजू शिंदे, युवराज वेटाळे,संतोष फगरे,अँड एच. के. देसाई, विनायक पाटील,पृथ्वीराज पाटील,नामदेव आडेकर, तुषार पाटील,रामदास पाटील, शंकर ढेंगे, संदिप कोराणे, प्रथमेश बलुगडे, अभि गौड, शुभम पोवार, अरविंद येजरे, आप्पासो आडेकर हे आणि सर्व युवक हजर होते.

सर्व युवक वर्गाच्या सहकार्यातून असे उत्कृष्ट काम आज करता आले यापुढे सुद्धा सर्वाना सोबत घेऊन चांगले चांगले उपक्रम राबवण्याचा संकल्प आहे तशी कृती करू .
उपसरपंच- प्रदिप करडे

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks