ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गडहिंग्लज : सरोळी येथील विनापरवाना पोल्ट्री बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

नेसरी प्रतिनिधी :
गडहिंग्लज तालुक्यातील सरोळी येथे ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाची परवानगी न घेता, गावालगतच विनापरवाना पोल्ट्री काढून नागरिकांच्या व जवळच असणाऱ्या अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या पोल्ट्री चालक यांच्यावर योग्य ती कारवाई करून पोल्ट्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी पशुसंवर्धन अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून सरोळी ग्रामस्थांनी केलेली आहे. या निवेदनावर सुबराव पाटील, नागेश बामणे, परशुराम सुतार, संजय पाटील, विजय शिंदे, अरुण मोरबाळे, व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.