राज्यपाल भगतसिंग कोशारी विरोधात कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत वादग्रस्त व्यक्त व्यक्त केल्याने राज्यभरातुन प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चे खरे विचार बाहेर आले त्यांचं वय आणि केलेल्या वक्तव्यावरून त्यांना निवृत्तीची गरज आहे.केंद्र शासनाने तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची महाराष्ट्र राज्यातून हाकलपट्टी करावी. व जाहीर माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईल हिसका दाखवू असा इशारा आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने देण्यात आला व राज्यपाल यांचा निषेध करण्यात आला.
जय भवानी जय शिवाजी माफी मागा माफी मागा राज्यपाल माफी मागा राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची महाराष्ट्रातून हाकलपट्टी झालीच पाहिजे. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपशब्द काढाल तर शिवसेना शांत बसणार नाही. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे वयानुसार मानसिक संतुलन बिघडले आहे. केंद्र शासनाने अशा संतुलन बिघडलेल्या राज्यपाल कोशारी यांची महाराष्ट्रातून हाकलपट्टी करावी. अशी मागणी घोषणा देत शिवसैनिकांनी केली.
यावेळी शहर प्रमुख जयवंत हारूगले, माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, मा. नगरसेवक नंदकुमार मोरे, मा. जिल्हाप्रमुख रवी चौगुले, किशोर घाडगे, सुनील भोसले, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव,सुनील जाधव, रियाज बागवान, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.