ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र

Breaking News : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड, सामूहिक अत्याचार ; मणिपूरमधील घटनेने देश हादरला !

मागील काही महिन्यांपासून हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमधील आणखी एका घटनेने देशात खळबळ उडाली आहे. दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्यानंतर या महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना 4 मे रोजीची असल्याची माहिती आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिजिनियस ट्रायबल लीडर फोरमने (ITLF) म्हटले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका समुदायाच्या जमावाने दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली असून शेतात त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला आहे. ITLF ने राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित आदिवासी आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

कुकी आदिवासींच्या संघटनेकडून गुरुवारी चुरचांदपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातही या अत्याचाराचा मुद्दा उचलण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. मणिपूरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन अराजकता निर्माण करत आहे. आयडिया ऑफ इंडियावर जोपर्यंत सातत्याने हल्ला सुरू आहे, तोपर्यंत भारत गप्प बसणार नाही. आम्ही मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. शांतता हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks