ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सरपिराजीराव घाटगे नागरी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथील सरपिराजीराव घाटगे नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. या सभेत प्रतिमा पूजन संस्थेचे सभापती मनोहर आवटे यांच्या हस्ते झाले. सचिव अरुण जोशी यांनी नोटीस वाचन केले. मागील सभेचा अहवाल वाचल्यानंतर सभेने त्यास मंजुरी दिली. दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, शिष्यवृत्तीधारकांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. संचालक मंडळाने सभासदांनी विचारलेल्या शंकांचे समाधान केले. स्वागत मनोहर आवटे यांनी केले. संस्थापक एम. डी. रावण यांनी प्रास्ताविक केले. आभार संचालक रामचंद्र खराडे यांनी मानले.