ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुदरगड : जयहिंद सहकार समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोनवडे ता.भुदरगड येथील जयहिंद सहकार समुहातील जयहिंद सेवा संस्था ,शिवभवानी दूध संस्था , जयहिंद दूध संस्था या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संयुक्तरित्या खेळीमेळीत पार पडल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी भुदरगड तालुका संघाचे संचालक, समूहाचे प्रमुख प्रा.हिंदुराव तथा एच.आर.पाटील होते.

जी . के. पाटील सर यांच्या “थुई थुई आभाळ” या कविता संग्रहाचा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश केलेबद्दल सत्कार करण्यात आला.तर मुंबई पोलीस चालकपदी निवड झालेबद्दल ओंकार बाजीराव पाटील, ITBP पोलीसपदी निवड झालेबद्दल अक्षय वसंत पाटील,कोतवालपदी निवड झालेबद्दल वैभव वसंत पाटील या सभासद पाल्यांचा सत्कार करण्यात आला . शिवाय दहावी,बारावी ,NMMS आणि स्कॉलरशिप उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .

सत्काराला उत्तर म्हणून देताना परिस्थितीवर मात करत नूतन ITBP पोलीस म्हणून निवड झालेल्या अक्षय याने वेळोवेळी व मागेल त्यावेळी आर्थिक मदत केल्यामुळे जयहिंद सहकार समूहाचा मी व माझे कुटुंबिय ऋणी आहोत असे सांगत प्रसंगाला उभा राहिलेल्या संस्थापक प्रा.हिंदुराव पाटील आणि संस्था समूहाचे ऋण व्यक्त केले .अक्षयच्या मनोगताने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. तर सत्कारमूर्ती गोविंद पाटील सर यांनी गावच्या व घरच्या माणसांनी केलेल्या सत्काराने भारावून गेलो असून कृतार्थ झाल्याचे सांगितले .

संस्थेस जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादक अनुक्रमे…
प्रथम क्रमांक – पांडूरंग शामराव पाटील
द्वितीय क्रमांक- आनंदा महादेव पाटील
तृतीय क्रमांक -आनंदराव दत्तात्रय लोकरे
तर गाय दुधात अनुक्रमे
प्रथम क्रमांक -दिपक प्रकाश लोकरे
द्वितीय क्रमांक – सुहास शिवाजी पाटील
तृतीय क्रमांक – विलास कृष्णा पाटील
या दूध उत्पादकांना भरीव स्वरुपाची रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

पारदर्शक व्यवहार ,प्रामाणिक सभासद , तत्पर कर्मचारी यामुळे हा समूह नावारूपाला आला असून तालुक्यात या संस्था समूहाची एक वेगळी ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन संस्थापक प्रा . एच .आर .पाटील यांनी केले तर जयहिंद सेवा संस्थेच्या सभासदांना यावर्षी पाच टक्के डिव्हीडंट वाटप करण्याचे जाहीर करण्यात आले .संस्था स्थापने पासून १०० % कर्जवसुलीची परंपरा कायम ठेवणाऱ्या सभा सदांचा व प्रथम कर्जफेड करणाऱ्या तुकाराम दत्तू पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन पी.के.पाटील सर यांनी केले . स्वागत व प्रास्ताविक संस्थापक प्रा.एच. आर .पाटील यांनी तर अहवाल वाचन सचिव दयानंद पाटील व सचिव संभाजी पाटील यांनी केले .

यावेळी सखाराम पाटील, पी .आय .पाटील ,धनाजीराव शिंदे, जगन्नाथ भोसले, यशवंत लोकरे, जयसिंग शिंदे,सुनिल पाटील, एस.एल.शिंदे , डी . डी . पाटील , रघुनाथ पाटील ,सचिन पाटील ,टी .आर . पाटील , अशोक डावरे , संदिप पाटील ,अरविंद चव्हाण ,नामदेव पाटील, लक्ष्मण पाटील , टी . एल . शिंदे ,अनिल शिंदे वाय .के .पाटील ,राहूल पाटील ,तात्यासाहेब शिंदे , मारुती म .पाटील ,रामचंद्र ये .पाटील, रविंद्र मा .पाटील, के.बी .पाटील, विठ्ठल नाधवडेकर , सर्जेराव पाटील, बाळासो पाटील, कृष्णात कांबळे ,साताप्पा पाटील, ए .डी . पाटील ,संजय पाटील ,सुनिल गुरव ,सुहास बुडके, कृष्णात पाटील ,संदिप पाटील ,एकनाथ पाटील , दिपक पाटील,तानाजी पाटील , हिंदुराव गुरव ,रमेश पोटळे ,दत्तात्रय पाटील ,सुनिल पाटील,प्रदिप शि .पाटील ,अवधूत मोरे आदींसह संस्था समूहातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ग्रा. पं .सदस्य तानाजी मारुती पाटील यांनी मानले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks