ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड मध्ये ग्रामदैवत अंबाबाई यात्रेनिमित्त तब्बल 1 लाख बक्षीस रकमेच्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड येथील ग्रामदैवत अंबाबाई यात्रेनिमित्त मुरगुड मधील शर्यत प्रेमी यांच्या वतीने तब्बल 1 लाखाच्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे या विजेत्या स्पर्धकास मानाचा किताब मुरगूड केसरी नावाने गौरवण्यात येणार आहे . या स्पर्धेमध्ये राज्यभरातील नामांकित बैलगाडी सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेमध्ये दृतीय क्रमांकाचे बक्षीस 71,000 आणि तृतीय क्रमांकाचे 51,000 या स्पर्धा दोन गटामध्ये होणार असून पहिलं ब गट आणि दुसरा आदत दुस्सा यामध्ये होणार आहे .बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी संध्याकाळी ठीक चार वाजता तलाव माळ येथे स्पर्धा पार पडणार आहेत या स्पर्धेच्या नियोजनासाठी कमिटी राबत असून स्पर्धेचे चोख नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ड्रोन द्वारे शर्यतीचे रेकॉर्डिंग , संपूर्ण स्पर्धे ट्रॅक वरती बॅरिकेटिंग , स्वय सेवकांची मोठी फौज, आणि वाहनांना बंदी, आणि सुरक्षेसाठी ॲम्बुलन्स आणि डॉक्टर अशी तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाईल असे कमिटीतर्फे सांगण्यात आले आहे संपूर्ण मुरगूड शहराच्या वतीने एक गाव एक कमिटी या अंतर्गत ही स्पर्धा ठेवण्यात आली असून पूर्ण स्पर्धा ही प्रामाणिकपणे पार पडणे जबाबदारी कमिटीने घेतली आहे.

या स्पर्धेच्या अनुषंगाने मुरगुड पोलीस स्टेशन, मुरगुड नगरपरिषद, पशुवैद्यकीय दवाखाना, मुरगुड ग्रामीण रुग्णालय, शक्तीप्लस मुरगूड वाला ,मुरगूड शहर नागरिक ,मुरगूड पत्रकार फाउंडेशन, शर्यत शौकीन यांचे बहुमोल सहकार्य लाभले असल्याचे कमिटीतर्फे सांगण्यात आले आहे सदर पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने स्वागत प्रास्ताविक पांडुरंग पुजारी यांनी केले ते आभार शिवाजी मोरबाळे यांनी मानले.

यावेळी सुखदेव पाटील, अरुण मेंडके , पृथ्वीराज कदम , रोहित मोरबाळे, अजित कांबळे, पृथ्वीराज चव्हाण,अजित शिंदे , अमित गोधडे , प्रितेश साळोखे, समाधान बोते,वैभव पाटील, अवधूत मोरबाळे यांच्यासह अंबाबाई यात्रा बैलगाडी शर्यत कमिटी, शर्यत शौकीन मित्र परिवार उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks