ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांला १ लाख १० हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे यांना एक लाख दहा हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या कार्यालयात आज (दि. ३) दुपारी ही कारवाई करण्यात आली.

कोल्हापुरात आज वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदार हे वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पुरवठा करण्याचे काम करतात.

त्यांनी ऑनलाईन महा टेंडर वरती कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक असलेले साहित्य हे ऑनलाइन महा टेंडर वरती आलेल्या जाहिरातीनुसार पुरवले होते. सदर साहित्याचे एकूण बिल हे 8,89,200/- रुपयाचे झाले होते.

सदर बिल मंजूर करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे वरील बिल रकमेच्या अंदाजे 15 टक्के प्रमाणे लाच मागणी करून तडजोडीअंती 1,10,000 /-₹ लाचेची मागणी करून ती लाच रक्कम आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks