मुरगुड विद्यालय (जुनि/कॉलेज) मुरगुडला महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्रदान

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
इंडियन टॅलेंट सर्च या संस्थेमार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड या नामांकित शाळेस प्रदान करण्यात आला. लातूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री ,नामदार संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव आदरणीय जयकुमार देसाई साहेब, अध्यक्ष शिवानी ताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, कोजीमाशीचे अध्यक्ष बाळ डेळेकर, यांचे याकामी प्रोत्साहन लाभले. प्राचार्य एस. आर .पाटील, उपप्राचार्य एस.पी.पाटील,पी.एस.पाटील, प्रशांत डेळेकर, श्रीकृष्ण बोंडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.