कुमार भवन, शेणगाव शाळेत सदिच्छा समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा

शेणगांव :
श्री. मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी बी. एड्. आंतरवासिता टप्पा -2 या प्रात्यक्षिकाचा सांगता समारंभ व बक्षीस वितरण सोहळा कुमार भवन, शेणगाव शाळेत पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र NGO समितीचे अध्यक्ष युवराज यडूरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुमार भवन,शेणगाव शाळेचे मुख्याध्यापक प्रा.डॉ.एस्.बी. शिंदे उपस्थित होते. बी.एड्.आंतरवासिता मार्गदर्शिका आणि आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.पी.एस्.देसाई उपस्थित होत्या. कुमार भवन, शेणगाव शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बी.एड्.छात्रप्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविक बी.एड्.छात्रप्रशिक्षणार्थी ओमकार चव्हाण यांनी केले.प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रियांका मगदूम यांनी केली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.एस्.बी.शिंदे यांनी मानाची शाल व फुल देऊन केले. बक्षीस वितरण सोहळ्यात आंतरवासिता कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये गणित प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, ग्रीटिंग कार्ड स्पर्धा अशा विविध स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे क्रमांक काढण्यात आले आणि बक्षीस वितरण केले. बी.एड्. आंतरवासिता छात्रप्रशिक्षणार्थी यांनी कुमार भवन, शेणगाव शाळेला भेटप्रधान केली.
प्रमुख पाहुणे मनोगतामध्ये युवराज यडूरे यांनी विद्यार्थ्यांच्यातील कौशल्य, स्वजाणीव, समाजकार्य, बी.एड्.छात्रप्रशिक्षणार्थींना शुभेच्छा यावर मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा.डॉ.एस्.बी.शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांच्या कार्याची ओळख, बी.एड्.छात्रप्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शक मनोगतात प्रा.डॉ.पी.एस्.देसाई यांनी विद्यार्थ्यांनी सतत कार्यरत राहावे, दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा, कुमार भवन शाळेचे ऋण व्यक्त केले. विद्यार्थी मनोगतामध्ये इयत्ता नववीची विद्यार्थिनी सौंदर्या हासबे हिने आंतरवासिता छात्रप्रशिक्षणार्थी यांच्याविषयी मत व्यक्त केले. बी.एड्.छात्रप्रशिक्षणार्थी मनोगतामध्ये आंतरवासिता मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी आंतरवासिता मध्ये अध्यापन व उपक्रम करताना आलेले अनुभव व्यक्त केले.
सांगता समारंभ व बक्षीस वितरण सोहळा या कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने केली. आभारप्रदर्शन बी. एड्. छात्रप्रशिक्षणार्थी अंकिता नलवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अंतिम ‘आझादी का सफर’ या भित्तीपत्रकेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्रप्रशिक्षणार्थी काजल परीट व अश्विनी जेधे यांनी केले.