ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप, हासोरी भागात सकाळपासून तीन भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लातूर जिल्ह्यातील हासोरी भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. किल्लारी भूकंपाच्या घटनेला कालच तीस वर्षे पूर्ण झाली असतांना, आज हासोरी भागात सकाळी सौम्य धक्का बसल्यामुळे नागरिक भयभीत आहेत.

निलंगा तालुक्यातील हसोरी बु. आणि हासोरी खु. परिसरात सोमवारी सकाळी 6.29 वाजता जमिनीतून गूढ आवाज होऊन भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्क्याने घरावरील पत्रे चांगलेच थरथरत होते. या धक्क्याची 2.8 रिस्टर स्केल इतकी तीव्रता नोंद झाली आहे. हा सौम्य स्वरूपाचा धक्का होता. विशेष म्हणजे सकाळच्या धक्क्यानंतर पुन्हा काही तासांनी म्हणजेच 10.30 ते 10.45 दरम्यान पुन्हा दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी याच दिवसात हासोरी आणि परिसरात भूकंपाचे अनेक धक्के बसले होते. पुन्हा या वर्षी भूकंपाचे धक्के बसत असल्याने काहीतरी मोठा अनर्थ होऊन भयंकर घटना घडेल अशी भीती येथील नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे. किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला नुकतेच 30 वर्ष पूर्ण झाले असून, आजही त्या काळातील जखमा ताज्या आहेत. यातच या घटनेमुळे येथील नागरिकांना आणखीन असुरक्षित वाटत आहे.

गेल्यावर्षी देखील धक्के जाणवले होते…

हासोरी भागात आज पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कारण गेल्यावर्षी 16 सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळात परिसरात एकूण नऊ धक्के बसले होते. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले होते. सलग दोन महिने गावातील लोकांमध्ये या घटनेची भीती पाहायला मिळाली होती. पण आता पुन्हा एकदा आज याच भागात 3 धक्के बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्यावर्षी झालेल्या घटनांच्या नोंदी…

पहिला धक्का : 16 सप्टेंबर 2022
दुसरा धक्का : 25 सप्टेंबर 2022
तिसरा धक्का : 26 सप्टेंबर 2022
चौथा धक्का : 29 सप्टेंबर 2022
पाचवा धक्का : 01 ऑक्टोबर 2022
सहावा धक्का : 04 ऑक्टोबर 2022
सातवा आणि आठवा धक्का : 9 ऑक्टोबरला 2022 ला बसला होता. (यात सर्वात मोठा धक्का हा 2.1 रिश्टर स्केलचा होता)
11 ऑक्टोबरला देखील नोंद.

लातूरच्या भूकंपमापन केंद्रापासून 49 किलोमीटर ते 59 किलोमीटर अंतरावर हासोरी भागामध्ये या भूकंपाची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा धक्के जाणवले नव्हते. मात्र आज सकाळी पहिला धक्का जाणवला होता. त्यानंतर सकाळी पुन्हा दोन धक्के जाणवले आहेत. यामुळे या भागातील नागरिक भीतीच्या वातावरणाखाली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks