राधानगरी तालुक्यात स्वच्छता ही सेवा कार्यक्रम उत्साहात

नेहरू युवा केंद्र कोल्हापूर, ( युवा कार्यक्रम आणी क्रीडा मंत्रालय भारत सरकार ) व ग्रामपंचायत सावर्डे पाटणकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमा निमित्ताने एक तारीख एक तास श्रमदान कार्यक्रम मौजे सावर्डे पाटणकर ता.राधानगरी या ठिकाणी नेहरू युवा केंद्र कोल्हापूर आणी ग्रामपंचायत सावर्डे पा. यांच्या मार्फत स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातील विद्या मंदिर सावर्डे पा. व श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय सावर्डे पाटणकर यांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी विद्या मंदिर सावर्डे पा व जोतिर्लिंग देवालय सावर्डे पा परिसरात स्वच्छता करण्यात आली . यावेळी गावाच्या सरपंच मा. श्रीमती सुमन मोरे (वहिणीसाहेब), उपसरपंच मा. श्री सुरेश परीट साहेब ,ग्रामसेवक समिधा पाटील मॅडम , व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी स्टाफ , शिक्षक स्टाफ, युवा मंडळ सदस्य,ग्रामस्थ आणि नेहरू युवा केंद्र , कोल्हापूर चे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक गौरव पाटील उपस्थित होते.