ताज्या बातम्या
जी.बी.पाटील यांना ‘उत्कृष्ठ मंडळ अधिकारी’ पुरस्कार

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आजरा सज्याचे मंडळ अधिकारी जी बी पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर वतीने उत्कृष्ठ मंडळ अधिकारी हा पुरस्कार प्राप्त झाला सदर पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले तसेच आजरा तहसील कार्यालयात तहसीलदार विकास अहिर व सपोनी सुनील हारुगडे यांच्या हस्ते जी बी पाटील याना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार डी डी कोळी,सर्व वरिष्ठ अधिकारी,मंडळ अधिकारी,तलाठी व इतर उपस्थित होते