कोल्हापूर : टाकाळा परिसरातील कॅफेमध्ये अश्लील चाळे करणारे १२ युवक-युवती ताब्यात ; निर्भया पथकाची कारवाई

कोल्हापूर येथील टाकाळा मध्यवर्ती परिसरातील इमारतीच्या तळमजल्यावर सुरू असलेल्या ‘टोक्यो कॅफे’मध्ये मंगळवारी दुपारी निर्भया पथकाने छापा टाकून अश्लील चाळे करणार्या 12 युवक-युवतींना ताब्यात घेतले. कारवाईत बेड आणि निरोधची पाकिटे आढळून आली. पथकाच्या कारवाईमुळे कॅफेच्या नावाखाली चालणार्या अवैध धंद्याचा भांडाफोड झाला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
टाकाळा परिसरात एका इमारतीच्या तळमजल्यावर ‘टोक्यो कॅफे’मध्ये गैरप्रकार चालत असल्याची माहिती मिळताच निर्भया पथकातील सहायक फौजदार संगीता विटे, कॉन्स्टेबल भाग्यश्री राख, विजया बरगे, स्मिता जाधव यांच्या पथकाने छापा टाकला. कॅफेची झडती घेतली असता त्यामध्ये बेड आणि निरोधची पाकिटे आढळून आली. याबाबत कॅफेचालकाकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे सांगण्यात आले.
कॅफेमध्ये 18 ते 22 वयोगटातील युवक-युवती अश्लील चाळे करताना पथकाच्या निदर्शनास आले. संंबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले. कॅफेवरील कारवाईची माहिती वार्यासारखी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कॅफेचालक, मालक व ताब्यात घेतलेल्या युवक- युवतींविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
उमा टॉकिज चौक परिसरातील एका कॅफेवर दीड महिन्यापूर्वी छापेमारी झाली होती. कारवाईत अनेक गैरकृत्यांचा भांडाफोड झाला होता. त्यामुळे शहर, जिल्ह्यात कॅफेंमध्ये चालणार्या प्रकारांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सक्त सूचना दिल्या होत्या ,तरीही टाकाळा परिसरातील कॅफेमध्ये गैरकृत्य सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.