ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मळगे बुद्रुक येथील पाटील कुटुंबीयांचे मुश्रीफ यांचेकडून सांत्वन

मुरगुड प्रतिनिधी :
मळगे बुद्रुक ता कागल येथील जिल्हा बॅकेचे वसुली आधिकारी व भैरवनाथ सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष संजय हरिभाऊ पाटील वय ५३ यांचे निधन झाले. या प्रसंगी गोकुळ चे संचालक नविद मुश्रीफ यांनी पाटील यांच्या घरी जाऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे बिद्री कारखाना संचालक प्रविण भोसले, विकास पाटील, रघुनाथ अस्वले, दिग्वीजय पाटील, रंगराव पाटील उपस्थित होते. दरम्यान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ मुंबईत असून त्यांनी दूरध्वनी द्वारे पाटील कुटुंबीयांना धीर दिला.