ताज्या बातम्यानिधन वार्ता
कोटेश्वर विकास संस्थेचे सेवानिवृत सचिव सदाशिव चौगले यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :
तब्बल चार दशके सहकार चळवळीत सचिव म्हणून कामगिरी बजावणारे करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील सदाशिव ज्ञानू चौगले (वय ७०)यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे सेवानिवृत सचिव होत.
त्यांनी माजी कृषिराज्यमंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली कॉग्रेस पक्षात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ,सुना नातवंडे असा परिवार आहे.