ताज्या बातम्या

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करा : निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केल्या.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय सभा आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा समन्वयक चारुशीला, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे तसेच समिती सदस्य(ऑनलाइन) उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपानास कायद्याने मनाई आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्हा तंबाखूमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही श्री. गलांडे यांनी यावेळी केल्या.

डॉ. प्रल्हाद देवकर यांनी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. समिती सदस्यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे विविध सूचना केल्या.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks