विश्वनाथराव मुरगुड सहकारी बँक सभासदांना 11 टक्के लाभांश देणार : प्रवीणसिंह पाटील

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी
बँकेकडे आज अखेर 77 कोटी 50 लाखाच्या ठेवी आहेत.अहवाल सालात 85 लाख 52 हजार रुपये नफा झाला असून बँकेच्या सभासदांना 11 टक्के लाभांश वाटप केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी दिली.
बँकेच्या 76 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते . प्रारंभी बँकेचे आद्य संस्थापक विश्वनाथराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले. विषय पत्रिका व अहवाल वाचन, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगले यांनी केले .विषय पत्रिकेवरील दहा व आयत्या विषयावर सविस्तर चर्चा करून सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी सखाराम डेळेकर,रघुनाथ सूर्यवंशी, सदाशिव आमते,पांडुरंग चांदेकर,कुंडलिक चौगले, पांडुरंग डाफळे,आनंदराव कल्याणकर,राहुल वंडकर,विजय शेट्टी यांनी चर्चेत भाग घेतला.
एकनाथ मांगोरे,सातापा पाटील,विठ्ठल भारमल, बाळासो पाटील,आनंदा पाटील, नंदकुमार ढेंगे, वासुदेव मेटकर,सुधीर सावर्डेकर,लक्ष्मी जाधव, रेवती सूर्यवंशी, संजय मोरबाळे,बाजीराव रजपूत, नितीन शिंदे,बाजीराव इंगळे,मारुती घाटगे, नंदकुमार दबडे आदी मान्यवर उपस्थित होते.आभार उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी मानले.