ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा सुतार लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या २४ व्या वधुवर सुचक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कळे वार्ताहर : अनिल सुतार

कोल्हापूर जिल्ह्यातील सुतार लोहार समाज बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर या संस्थेच्या २४ व्या वधुवर सुचक व समाज परिचय मेळाव्याला जिल्ह्यासह कर्नाटक सीमाभाग व सातारा येथील सुतार लोहार समाज वधुवर व नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सुतार लोहार समाजातील अनेक वधु-वरांचे लग्न जुळून यावे तसेच समाज बांधव एकत्र यावा या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर येथील इंदिरा सागर मंगल कार्यालय येथे सुतार लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दि ११ फेब्रुवारी रोजी सुतार-लोहार समाज वधुवर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विवाह बंधन जुळवण्यासाठी नववधु-वरांसह ,विधुर,विधवा व घटस्फोटित यांनीही नाव नोंदणी केली होती. त्यामुळे या मेळाव्यास मुला-मुलींसह नातेवाईकांनी प्रचंड गर्दी दिसून येत होती यामध्ये एकुण दोनशेहून अधिक वधु व वरांनी नाव नोंदणी केली आहे.

कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन पंढरपूर येथील बिल्डर्स आणि डेव्हलपर्स चे शशिकांत सुतार यांनी केले त्यानंतर सर्व उपस्थित यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व अखिल भारतीय वंशी सेना गोवा राज्य प्रभारी शिवाजीराव विष्णू सुतार गोवा उद्योजक,रामचंद्र सुतार सेक्रेटरी,शिवाजीराव शामराव सुतार उपाध्यक्ष यासह विविध मान्यवर उपस्थित होते.समारंभामध्ये अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव सुतार यांनी मुलांकडील व मुलींकडील नातेवाईकांनी आपल्या अपेक्षा कमी करुन विवाह बंधन जुळवण्यासाठी एकत्र यावे व समाजातील प्रत्येकाने विविध क्षेत्रात झेप घेत कार्यरत राहावे, आपल्या समाजातील गरजूंना मदत करावी आणि समाजाला वेगळी दिशा मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष नामदेव सुतार निवडेकर , सल्लागार दिपक केशव सुतार, सुनिल शिवाजीराव सौंदलगेकर ,खजानिस राजेंद्र र सुतार,संचालक नामदेव द सुतार,किसन लोहार, लक्ष्मण सुतार, सुधाकर सुतार, आनंदराव सुतार यांनी केले होते.भविष्यात या संस्थेकडून सुतार लोहार समाजासाठी विविध सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks