कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. एकीकडे मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारले असून राज्यभर दौरा करत आहे. तर दुसरीकडे आज कोल्हापूरमध्ये अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे . संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थितीत होते.
अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची ही भेट नियोजित नसल्याची माहिती आहे .अजित पवार अचानकपणे शाहू छत्रपती यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेस येथे दाखल झाले. गेल्या पाऊणतापासून ही बैठक सुरु आहे. या बैठकीला मराठा समाजाचे काही नेतेही उपस्थित असल्याचे समजते. 16 जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
या भेटीनंतर अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतली .