पन्हाळा तालुक्यात ‘ मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रम उत्साहात !

कळे -वार्ताहर अनिल सुतार
देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे आणि त्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मानार्थ संपूर्ण देशभर ‘मेरी माटी-मेरा देश’ तथा ‘मिट्टी को नमन’, ‘वीरों को वंदन’ उपक्रमाचे आयोजन करून राष्ट्राभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन भाजपा पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार परितकर यांनी केले.
देशाचे कणखर नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पन्हाळा तालुका ( पश्चिम ) च्यावतीने राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता सेवा पंधरवडा सिध्दकला हायस्कूल मल्हारपेठ या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रतापसिंह काळे
( अनुसुचित अध्यक्ष भाजपा ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 ते 2023 या नववर्षाच्या कालखंडातील अनेक विकास कामांचा परिचय करून दिला .विशेषतः दिल्लीच्या प्रगती मैदानावर झालेल्या G-20 जागतिक परिषदेची माहिती प्रत्येक बुथप्रमुखा पर्यंत व्यासपीठावरुन बोलत असताना पोहचवली .
सरकारने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेने दिल्ली आणि ७ हजार ५०० गावांमध्ये देशी आणि स्थानिक वनस्पतींचे उद्यान उभारण्यासाठी ‘अमृत वाटिका’ योजना सुरू केली आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानांतर्गत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांना नमन करुन पंच प्राण शपथ सर्व कार्यकर्त्यांना दिली.
बैठकीस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंदार परितकर,जेष्ठ कार्यकर्ते मारुतीराव परितकर, शिवाजी पाटील (यवलूज), जेष्ठ मान्यवर लक्ष्मण पाटील, गामाजी पाटील,रघुनाथ झेंडे, पांडुरंग गुंडू पाटील, प्रकाश पाटील,लक्ष्मण तळेकर, युवा कार्यकर्ते दिग्विजय पाटील,युवराज पाटील,गणेश काटकर,प्रकाश सुतार,तेजस परितकर,भिकाजी गुरव, सचिन केसरकर, स्वप्निल पाटील, दिलीप पाटील, राजू पाटील, कुमार रसाळ, विठ्ठल रसाळ, अरुण पाटील,दत्तात्रय पाटील,पी.जी चौगुले,संदीप पाटील,विशाल किरुळकर,बळवंत टिक्के, विनायक पाटील व भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.