मुरगूड : शिवराज विद्यालयाच्या आदित्य दिवटेची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोनवडे ता. भुदरगड येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाचा ( साई आखाडा ) मल्ल व येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आदित्य अनिल दिवटे याने १७ वर्षाखालील ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात ८० किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची कुरुंदवाड ( कोल्हापूर ) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याला एनआयएस प्रशिक्षक दादासो लवटे, वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन तर जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष अॅड. वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य पी डी माने, उपमुख्याध्यापक रविंद्र शिंदे, पर्यवेक्षक संतोष कुडाळकर, क्रीडाशिक्षक एकनाथ आरडे वडील अनिल दिवटे यांचे प्रोत्साहन मिळत आहे.