ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हसणे धनगरवाडा शाळेत फडकला पहिल्यांदाच तिरंगा; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थही भारावले

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले

हसणे धनगरवाडा (ता. राधानगरी) येथील शाळेत अपुरी शिक्षक संख्या, मनुष्यबळाचा अभाव, करावी लागणारी पायपीट यामुळे येथील शाळेमध्ये ध्वजारोहन करणे शक्य नव्हते.पण राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेले येथील शाळेचे शिक्षक श्री मुदूगडे सर व श्री मोरजकर सर या जोडीने या प्रजासत्ताक दिनानिमित्य शाळेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्याचे ठरवले त्यास गावकऱ्यांनी व ग्रामपंचायतीने बहुमोल असे सहकार्य केले.आणि प्रथमताच या शाळेत ध्वज फडकवला गेला त्यामुळे ग्रामस्थांसह सर्वजण आनंदित झाले.

धनगरवाडा येथे आजपर्यंत कधी ध्वज फडकवला गेला न्हवता.येथे सर्वांच्यामते निर्णय होऊन ध्वज फडकवण्याचे ठरविले गेले. त्यामुळे या ध्वजारोहणाची उत्कंठा गावात शिगेला पोहचली होती.जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध,स्त्रिया यांनी हजेरी लावली हाती.हा सोहळा पाहण्यासाठी सर्वचजन आतुर झाले होते. शाळेविषयी आपुलकी असणारे एक निवृत्त शासकीय कर्मचारी, श्री विठ्ठल रामचंद्र शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर देशभक्तीपर गीते,राष्ट्रगीत,गाताना आणि परेड देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य जाणवत होते.कार्यक्रम संपल्यानंतर हातावर मिळालेल्या खाऊमुळे हे चिमुकले भारावून गेले.ध्वजाला सलामी देतांना या चिमुकल्यांचे चित्र सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवले होते.

ग्रामस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी शाळेला विविध नेत्यांचे फोटो भेट म्हणून दिले तसेच सातारा येथून आलेले मयूर मोरे मेकॅनिक यांनी सर्वांसाठी जिलेबी व मुलांसाठी समोसे आणले होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडून मुलांसाठी चॉकलेटचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला हसणे धनगरवाडा येथील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक,स्त्रिया, तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते आजचा हा कार्यक्रम पाहून सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम स्थळी ६५ वर्षाच्या वयोवृद्ध आजीबाईंनी हा चाललेला सोहळा पाहून काढलेले उद्गार कायमचे लक्षात राहण्याजोगे होते “असाच बाबा दरवर्षी कायम फडकत राहा'”.असे बोलून ती आजीबाई तिरंग्याला नतमस्तक झाली. खरंच तिला या तिरंग्याचे महत्व पटलं होत.आणि हा सोहळा सगळयांनाच भारावून टाकणारा होता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks